ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सरडा हा वातावरणानुसार रंग बदलतो. हिरव्या पानांजवळ हिरवा, लाकडाजवळ तपकिरी तर दगडाजळ काळा. तुम्हाला माहित आहे का, सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो, जाणून घ्या.
सरड्याची त्वचा पारदर्शक असते. त्वचेखाली पिंगमेंट पेशी असतात. यापेशी लाल, पिवळा आणि काळ्या रंगाने भरलेले असतात.
सरड्याच्या त्वचेमध्ये खास फोटोनिक क्रिस्टल्सचा विशेष थर असतो. ज्यामुळे सरडा प्रकाश परावर्तित करुन रंग बदलतो.
याचा अर्थ असा की, सरडा रंग बदलत नाही. सरड्याच्या त्वचेची रचना अशाप्रकारे असते की त्याचा प्रत्येक परिस्थितीत रंग वेगळा दिसतो.
जेव्हा सूर्यप्रकाश तीव्र असतो. तेव्हा उष्णता शोषून घेण्यासाठी सरड्याचा रंग काळा होतो. तसेच, अंधारात किंवा थंड वातावरणात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी सरड्याचा रंग हलका हिरवा होतो.
सरड्याचे रंग बदलणे हे वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असते. जसे की, तापमान, प्रकाश, भावना किंवा धोका.
वैज्ञानिकांच्या मते, सरडा दिवसभरात अनेकवेळा रंग बदलू शकतो. काही प्रजाती तर मिनिटांत देखील अनेकवेळा रंग बदलतात.