Diabetes: उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी किती वेळा जेवावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेह आणि आहार

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी जेवणे आणि योग्य आहार घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Diabetes | yandex

किती वेळा खावे?

उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी दिवसातून 5-6 वेळा कमी प्रमाणात जेवले पाहिजे. जास्त वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते.

diabetes | freepik

नाश्ता

सकाळी उठल्यानंतर एका तासाच्या आत हेल्दी आणि उच्च फायबरयुक्त नाश्ता करा. यामध्ये ओट्स, दलिया, अंडी, ब्राऊन ब्रेड किंवा स्प्राउट्स यांचा समावेश करा.

diabetes | Freepik

मिड स्नॅक्स

नाश्त्यानंतर दोन तासांनी तुम्ही नारळ पाणी, ताक, काकडी, सॅलड खाऊ शकता. हे पोट थंड ठेवतात आणि ऊर्जा देखील देतात.

diabetes | Saam Tv

दुपारचे जेवण

तुमच्या जेवणात भाकरी डाळ, हिरव्या भाज्या, दही आणि थोडा ब्राउन राइसचा समावेश करा. जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा.

diabetes | Canva

संध्याकाळी काय खावे?

संध्याकाळी भूक लागते अशावेळी मनुका, बदाम, शेंगदाणे किंवा हर्बल चहाचे सेवन करा.

diabetes | google

रात्रीचे जेवण

झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 तास आधी जेवण करा. तुम्ही मल्टीग्रेन रोटी, कमी चरबीयुक्त डाळ, हिरव्या भाज्या किंवा सूप खाऊ शकता. भात खाणं टाळा.

diabetes | Yandex

NEXT: 'हे' तीन पक्षी स्वप्नात दिसणं असतं शुभ, घडतात चांगल्या गोष्टी

dreams | yandex
येथे क्लिक करा