Manasvi Choudhary
दिवसातून तीन वेळा अंघोळ करू नये असे तुम्ही घरातील मोठ्या मंडळीकडून ऐकलेच असेल.
मात्र खरचं तीन वेळा अंघोळ करू नये का? काय होते याविषयी जाणून घ्या.
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातून घामाची धारा वाहते. उन्हाळ्यात अनेक जण दिवसातून २ ते ३ वेळा अंघोळ करतात.
अनेकवेळा अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्वचा कोरडी होते.
सकाळी लवकर अंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते, शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.
त्वचेचा ओलावा कमी झाल्यामुळे खाज सुटणे किंवा रॅशेस येण्याची शक्यता वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.