Surabhi Jayashree Jagdish
चालणं हा कमी प्रभावाचा व्यायाम असल्याने सांध्यांवर तुलनेने कमी ताण येतो आणि तो बराच वेळ सहज करता येतो. नियमित चालण्यामुळे कॅलरी बर्न होतात, मेटाबॉलिझमला चालना मिळते आणि शरीरातील चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत होते. तुमचं वजन आणि चालण्याचा वेग यानुसार एका तासात साधारण 200 ते 400 कॅलरी बर्न होऊ शकतात.
साधारणपणे शरीराचं 1 किलो वजन कमी करण्यासाठी सुमारे 7,700 कॅलरींचा डेफिसिट तयार करावा लागतो. त्यामुळे एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य असल्यास दररोज सुमारे 1,100 कॅलरींचा डेफिसिट तयार करावा लागेल.
सरासरी व्यक्तीला प्रत्येक 1,000 पावलांमागे साधारण 40 ते 50 कॅलरी बर्न होतात. त्यामुळे केवळ चालण्याच्या माध्यमातून एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्यासाठी दररोज अंदाजे 22,000 ते 27,500 पावलं म्हणजेच आठवड्याला सुमारे 1,54,000 ते 1,92,500 पावलं चालावी लागतील.
तुमचं शरीराचं वजन आणि चालण्याचा वेग यामुळे चालताना किती कॅलरी बर्न होतील यामध्ये फरक पडतो. तुलनेने जास्त वजन असलेल्या व्यक्तीला प्रत्येक पावलामागे अधिक कॅलरी बर्न होऊ शकतात. मात्र दररोज 22,000 ते 27,000 पेक्षा जास्त पावले चालण्यामुळे सांध्यांवर ताण येऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी फक्त पावलांची संख्या वाढवण्याऐवजी दररोजच्या आहारातून सुमारे 500 कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. आहारातील कॅलरी कमी केल्यास दररोजचं स्टेप्सचं लक्ष्य साधारण 12,000 ते 15,000 पर्यंत ठेवता येऊ शकतं.
फक्त चालण्याच्या माध्यमातून एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य अनेकांसाठी खूप कठीण ठरू शकतं. त्याऐवजी दररोज 10,000 ते 12,000 पावलं चालण्याचं लक्ष्य ठेवून साधारण 10 ते 15 दिवसांत 1 किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करता ये
कॅलरी बर्न वाढवण्यासाठी नेहमीच्या चालण्याऐवजी काही वेळ वेगाने चालण्याचा म्हणजेच ब्रिस्क वॉकिंगचा सराव करा. चढाच्या रस्त्यावर किंवा इन्क्लाइनवर चालल्यास सामान्य चालण्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होऊ शकते तर सुरुवातीपासूनच 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त पावलं चालण्याऐवजी दर आठवड्याला स्टेप्सची संख्या जास्तीत जास्त 10 टक्क्यांनी वाढवा.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.