Walking steps: रात्रीच्या जेवणानंतर किती पावलं चाललं पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

पायी चालणं

रात्री जेवण झाल्यावर थोडं चालणं आरोग्यासाठी उत्तम असतं. हे पचन सुधारतं आणि शरीर हलकं वाटतं. नियमित सवय लावल्यास दीर्घकालीन फायदा होतो.

किती पावलं चाललं पाहिजे

जेवणानंतर साधारण १००० पावलं चालणं योग्य मानलं जातं. यामुळे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हे लक्ष्य साध्य करणं सोपं आहे.

जेवणानंतर चाला

जेवणानंतर १० ते १५ मिनिटं चालल्याने शरीर एक्टिव्ह राहतं. यासाठी छोटा वॉकही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

कधी जावं चालायला?

जेवण झाल्यावर लगेच चालायला जाऊ नका. १५-२० मिनिटं थांबून मग हलका वॉक करा. यामुळे पचनसंस्थेला योग्य वेळ मिळतो.

कॅलरी बर्न होतात

फिटनेसचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर ३० मिनिटं चालणं फायदेशीर ठरतं. यामुळे शरीर अधिक तंदुरुस्त राहतं. कॅलरी बर्न होऊन वजन नियंत्रणात राहते.

पचनसंस्थेला मदत

जेवणानंतर चालल्याने पचनसंस्थेला मदत होते. गॅस आणि पोट फुगल्यासारखं वाटत नाही. पचन सुधारल्याने शरीर हलकं आणि आरामदायी वाटतं.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

peanut powder acidity
येथे क्लिक करा