CNG car mileage: 1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर्स धावते?

Surabhi Jayashree Jagdish

CNG कार

CNG कारमध्ये इंधन म्हणून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा वापर केला जातो. या कारमध्ये पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही इंधनांची सोय असते, त्यामुळे गरजेनुसार इंधन बदलता येते. भारतात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि ह्युंदाईसारख्या कंपन्या CNG कार विकतात.

CNG cars in India | saam tv

CNG कारचे मायलेज

CNG कारचे मायलेज किलोमीटर प्रति किलो (km/kg) या एककात मोजलं जातं. एका किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर धावते, यावरून तिचे मायलेज समजतं. कारचं मॉडेल, इंजिन, रस्त्याची स्थिती, वाहतूक आणि गाडी चालवण्याची पद्धत यांनुसार प्रत्यक्ष मायलेज बदलतं.

CNG car benefits | saam tv

1 किलो CNG मध्ये कार किती किलोमीटर धावते?

CNG कार 1 किलो गॅसमध्ये सुमारे 20 ते 30 किलोमीटर धावू शकते तर काही मॉडेल्समध्ये यापेक्षा जास्त मायलेज मिळतं. मारुती सुझुकी बलेनो CNG चे कंपनीने दिलेले मायलेज 33.61 km/kg आहे, तर ग्रँड विटारा CNG चे मायलेज 26.6 km/kg आहे.

Tata CNG cars | saam tv

CNG कारचं मायलेज कमी का होते?

CNG कारच मायलेज कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. ट्रॅफिर, वारंवार ब्रेक लावणं, अचानक वेग वाढवणं आणि टायरमध्ये योग्य हवा नसणं यांमुळे इंधनाचा वापर वाढू शकतो.

CNG car running cost | saam tv

मायलेज वाढवण्याच्या टिप्स

CNG कारचं मायलेज चांगलं ठेवण्यासाठी गाडी शक्यतो स्थिर वेगाने चालवा आणि अचानक वेग वाढवणं किंवा जोरात ब्रेक लावणं टाळा. टायरमध्ये कंपनीने सांगितलेल्या प्रमाणात हवा ठेवा आणि इंजिनची नियमित सर्व्हिसिंग करा.

CNG vs petrol cars | saam tv

CNG कार किफायतशीर आहे?

CNG चा प्रति किलो दर आणि पेट्रोलचा प्रति लिटर दर वेगळा असल्यामुळे दोन्ही कारचा खर्च किलोमीटरनुसार मोजणं योग्य ठरतं. एखादी CNG कार 25 km/kg मायलेज देत असेल आणि CNG चा दर 80 रुपये प्रति किलो असेल, तर तिचा इंधन खर्च 3.20 रुपये प्रति किलोमीटर होतो. पेट्रोल कारचा प्रति किलोमीटर खर्च यापेक्षा जास्त असल्यास CNG कारमधून बचत होते.

Maruti Suzuki Baleno CNG | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा