Reserve Fuel: पेट्रोलची रिझर्व्ह लाईट लागल्यावर कार किती किलोमीटर दूर जाऊ शकते?

Surabhi Jayashree Jagdish

कार रिझर्व्हवर गेल्याचं कसं समजतं?

कारच्या टाकीत इंधन कमी झाल्यावर डॅशबोर्डवरील फ्युएल इंडिकेटरची रिझर्व्ह लाइट लागते. ही लाइट लागली म्हणजे कारमध्ये इंधन पूर्णपणे संपलेलं नसतं तर टाकीत कमी इंधन शिल्लक असते. त्यामुळे ही लाइट दिसताच जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन इंधन भरून घेतलं पाहिजे.

Low fuel warning light

रिझर्व्हची लाइट

अनेकदा कारमध्ये पुरेसं पेट्रोल भरणं राहून जातं. लांब प्रवासात कारचं मायलेज लक्षात न घेतल्यास टाकीतील इंधन अपेक्षेपेक्षा लवकर संपतं. रिझर्व्हची लाइट अशा वेळी इंधन कमी झाल्याची सूचना देऊन चालकाला वेळीच सावध करते.

Fuel warning light meaning

रिझर्व्हमध्ये किती इंधन उरतं?

रिझर्व्हची लाइट लागते तेव्हा फ्युएल टँकच्या एकूण क्षमतेच्या सुमारे १० ते १५ टक्के इंधन उरलेलं असू शकतं. मात्र हा आकडा प्रत्येक कारसाठी सारखा नसतो आणि कारच्या मॉडेलनुसार तो बदलू शकतो. म्हणून रिझर्व्हची लाइट लागल्यावर टाकीत नेमके किती लिटर इंधन आहे हे फक्त लाइटवरून अचूक सांगता येत नाही.

Fuel tank capacity

४० लिटरच्या टाकीत किती इंधन उरू शकतं?

समजा कारच्या फ्युएल टँकची क्षमता ४० लिटर आहे तर १० ते १५ टक्क्यांनुसार रिझर्व्हमध्ये सुमारे ४ ते ६ लिटर इंधन असू शकतं. याचा अर्थ रिझर्व्हची लाइट लागल्यानंतर टाकी पूर्णपणे रिकामी झालेली नसते.

Low fuel indicator

कार किती अंतर जाऊ शकते?

रिझर्व्हमध्ये कार किती किलोमीटर धावेल हे उरलेलं इंधन आणि कारच्या मायलेजवर अवलंबून असतं. जसं की, कारला १५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळत असेल तर ४ लिटर इंधनात सुमारे ६० किलोमीटर अंतर होऊ शकतं. त्याचप्रमाणे ६ लिटर इंधन उरलं असेल तर हे अंतर सुमारे ९० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.

Car driving tips

१५ किमी प्रति लिटर मायलेज

समजा कारच्या टाकीत रिझर्व्हच्या वेळी ४ ते ६ लिटर इंधन उरलंय आणि कार १५ किमी प्रति लिटर मायलेज देतेय तर अशा परिस्थितीत कार साधारण ६० ते ९० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.

Diesel reserve

रिझर्व्हची लाइट लागल्यानंतर काय करावं?

रिझर्व्हची लाइट लागल्यावर कार अजून काही अंतर जाऊ शकते पण इंधन भरण्यासाठी जास्त वेळ थांबणं योग्य नाही. जवळ पेट्रोल पंप दिसताच कारमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेणं फायद्याचं आहे.

Distance on reserve fuel

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा