ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत तुर्की देशाने भारताच्या विरोधात आपली भूमिका मांडली.
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिपए एदोर्गान यांनी अलीकडेच भारताविरोधात भूमिका स्वीकारत पाकिस्तानला पाठिंबा दिला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, तुर्कीने उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली.
यानंतर भारताने तुर्कीविरोधात कारवाई करत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या विमान कंपनीचे सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली.
एर्दोगानने त्यांच्या अलीकडील वक्तव्यात म्हटले की, तुर्की देश पाकिस्तानसोबत खंबीरपणे उभा आहे.
तुर्की हा मुस्लिम देश असून येथे भारतीय नागरिक देखी राहतात. २७ मार्च २०२५च्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, तुर्कीमध्ये ३,३०६ भारतीय राहतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ मध्ये सुमारे ३.३ लाख भारतीय पर्यटकांनी तुर्की देशाला भेट दिली.
तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर, तुर्कीला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.