Manasvi Choudhary
अनेकांना उशीरा झोपणे, कमी झोपणे अश्या वाईट सवयी लागल्या आहेत. मात्र तुम्हाला माहितीये का झोपेचा देखील आरोग्यावर परिणाम होतो.
तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर दिवसभर तुमचा मूड खराब राहतो तुम्हाला फ्रेश वाटत नाही.
याशिवाय तुमच्या वयोगटानुसार तुम्ही पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
ं
नवीन जन्मलेले ते तीन महिन्यांच्या बाळांची पूर्ण झोप घेणे महत्वाचे आहे. जन्मानंतर शरीरात अनेक बदल होत असतात.
४ ते ११ महिन्यांच्या बालकांमध्ये मेंदू व शारीरिक विकास होत असतो अशावेळेस दररोज १२ ते १५ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
एक ते दोन वर्षातील मुलांनी निरोगी आरोग्यासाठी दररोज ११ ते १४ तास झोपणे आवश्यक आहे.
३ ते ५ वर्षातील मुलांनी निरोगी आरोग्यासाठी १० ते १३ तासांची झोप घ्यावी.
६ ते १२ वर्षातील मुलांमध्ये विकासात्मक बदल होतात यामुळे या वयात मुलांनी ९ ते १२ तासांची झोप घ्यावी.
१३ ते १८ म्हणजे किशोरवयात मुलांनी दररोज नियमितपणे ८ ते १० तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
वाढते वय आणि कामाचा ताण यामुळे आरोग्याकडे लक्ष राहत नाही यामुळे झोप पूर्ण होत नाही मात्र तरीही आरोग्याच्या काळजीसाठी या वयात ७ ते ९ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.