ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांना माहित आहे की, मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजनसोबत, अन्न आणि पाण्याची गरज असते.
दररोज अन्न आणि पाण्याचे सेवन केल्याने शरीराला दिवसभराच्या कार्यासाठी उर्जा मिळते.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का, माणूस किती दिवस न खाता पिता जगू शकतो, जाणून घ्या.
माणूस पाणी न पिता फक्त ३ दिवस जिवंत राहू शकतो.
तसेच, माणूस अन्नाशिवाय फक्त ३ आठवड्यापर्यंत म्हणजेच २१ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
३ दिवसपर्यंत पाणी न प्यायल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो. शरीरात ब्लड फ्लोसाठी पाण्याची आवश्यकता असते.
माणूस न खाता पिता किती दिवस जिवंत राहिल हे त्याच्या वय आणि आरोग्यावर देखील अवलंबून असते. काही वेळा लोक न खाता- पिता फक्त ८ ते १० दिवस जगू शकतात.