Surabhi Jayashree Jagdish
औरंगजेबाला वेगवेगळ्या पत्नींपासून एकूण ५ मुली होत्या. यापैकी फक्त 2 मुलींचं लग्न झालं होते.
औरंगजेबाची थोरली मुलगी राजकुमारी झेबुन्निसा होती. जेबुन्निसा यांना कविता लिहिण्याची आवड होती.
राजकुमारी झिनातुन्निसा बेगम ही औरंगजेबाची दुसरी मुलगी होती. औरंगजेबाने तिला 'पादशाह बेगम' ही पदवी दिली.
राजकुमारी झिनातुन्निसा यांचेही लग्न झाले नव्हते. तिने आयुष्यभर मुघल साम्राज्यावर आपली पकड कायम ठेवली.
राजकुमारी बदरुन्निसा बेगम ही औरंगजेबाची तिसरी मुलगी होती. बद्रुन्निसानेही लग्न केलं नाही.
झुबदतुन्निसा बेगम ही औरंगजेबाची चौथी मुलगी होती. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह याचा मुलगा सिफिर शिकोह याच्याशी तिचा विवाह झाला होता.
राजकुमारी मेहरुन्निसा बेगम ही औरंगजेबाची पाचवी मुलगी होती. मेहरुन्निसाचा विवाह इज्जत बक्श मिर्झा याच्याशी झाला होता.