Surabhi Jayashree Jagdish
निरोगी जीवनशैलीसाठी रात्रीचं जेवण खूप महत्वाचं मानलं जातं.
रात्रीचे जेवण रात्री उशिरा घेण्याऐवजी ते ७ ते ८ या वेळेत करावं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
भारतात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात हे तुम्हाला माहिती आहे का?
रात्रीच्या जेवणात किती चपाती खाल्ल्या पाहिजेत हे तुमच्या गरजेवर अवलंबून असतं. परंतु तुम्ही रात्री खूप जास्त आणि हेवी जेवण टाळलं पाहिजे.
जर तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर प्रौढ व्यक्तीसाठी रात्री दोन चपात्या पुरेशा मानल्या जातात.
अनेक लोक रात्रीच्या जेवणात नाचणी, ज्वारी, बाजरी इत्यादीपासून बनवलेली भाकरी खातात.
चपातीमध्ये कार्बोहाइड्रेट आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे दलिया, खिचडी इत्यादी रात्री खाव्यात.