Calories in 2 boiled eggs: दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज? प्रोटीन आणि फॅट्सही जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज?

आपण प्रत्येकजण उकडलेलं अंडं खातो. एका सामान्य आकाराच्या उकडलेल्या अंड्यामध्ये साधारण 70 ते 80 कॅलरीज असतात. त्यामुळे दोन उकडलेल्या अंड्यांमध्ये अंदाजे 140 ते 160 कॅलरीज मिळतात.

2 boiled eggs fat | saam tv

प्रोटीन आणि फॅट्स

एका उकडलेल्या अंड्यामध्ये साधारण 6 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यासोबत सुमारे 5 ग्रॅम फॅट आणि जवळपास 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे दोन अंड्यांमधून साधारण 12 ग्रॅम प्रोटीन आणि 10 ग्रॅम चरबी मिळू शकते.

boiled eggs health benefits | saam tv

अंड्यांमधील जीवनसत्त्वं

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 यांसारखी जीवनसत्त्वं आढळतात. ही जीवनसत्त्वं शरीरातील विविध महत्त्वाच्या कार्यांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे आहारात अंड्यांचा समावेश केल्यास या पोषक घटकांचा आहारातून पुरवठा होऊ शकतो

boiled eggs for healthy diet | saam tv

पौष्टिक अन्न

उकडलेलं अंडं हे अनेक पोषक घटकांचा समावेश असलेलं अन्न आहे. त्यातून प्रोटीन, फॅट्स, जीवनसत्त्वं आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून उकडलेलं अंडं घेता येतं.

fat in boiled eggs | saam tv

प्रोटीनचा महत्त्वाचा स्रोत

अंडं हे आहारातील प्रोटीनचा सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे. प्रोटीन शरीरातील स्नायू आणि इतर ऊतींच्या निर्मिती व दुरुस्तीसाठी महत्त्वाची असतात. त्यामुळे प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

eating boiled eggs | saam tv

अंडं कसं बनवलं जातं याचा कॅलरीजवर परिणाम

उकडलेल्या अंड्याच्या कॅलरीज प्रामुख्याने अंड्याच्या आकारावर आणि प्रमाणावर अवलंबून असतात. अंडं उकडल्यामुळे त्यात अतिरिक्त तेल किंवा तूप यांसारख्या पदार्थांच्या कॅलरीज जोडल्या जात नाहीत. मात्र अंडं तयार करण्याची पद्धत बदलल्यास एकूण कॅलरीजमध्ये फरक पडू शकतो

boiled eggs vitamins | saam tv

तेल किंवा मसाला

उकडलेल्या अंड्याऐवजी तेल किंवा इतर चरबीयुक्त पदार्थ वापरून अंडं तयार केल्यास त्यातील एकूण कॅलरीज वाढू शकतात.अंडं तळताना तेल वापरल्यास त्यातील कॅलरीज वाढतात.

vitamin B12 in eggs | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

egg protein benefits | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Digestion | saam tv
येथे क्लिक करा