Ghee calories: एक चमचा तुपामध्ये किती कॅलरीज असतात?

Surabhi Jayashree Jagdish

तूप

तूप हे भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. त्याच्या खास सुगंधामुळे आणि चवेमुळे प्रत्येक पदार्थ अधिक रुचकर बनतो. त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

अमृत समान

तुपाला आयुर्वेदात ‘अमृत’समान मानलं गेलंय. शरीराला पोषण देण्याबरोबरच ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे पारंपरिक उपचारांमध्ये तूपाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

कॅलरीज

एक मोठा चमचा तूप घेतल्यास त्यातून सुमारे 112 ते 135 कॅलरी मिळतात. त्यामध्ये 14 ते 15 ग्रॅम शुद्ध फॅट असतं जे शरीराला ऊर्जा देते. हे प्रमाण लक्षात घेऊनच त्याचं सेवन करणं आवश्यक आहे.

व्हिटॅमिन

तूपामध्ये व्हिटॅमिन A, D, E आणि K भरपूर प्रमाणात आढळतात. हे सर्व व्हिटॅमिन्स हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे नियमित आणि योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.

ब्यूटिरिक अ‍ॅसिड

तूपामध्ये ब्यूटिरिक अ‍ॅसिड नावाचा घटक असतो, जो पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. तो आतड्यांचे आरोग्य सुधारतो. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

स्वयंपाकासाठी सुरक्षित

तूप उच्च तापमानावरही चांगलं राहतं आणि त्यातील पोषक घटक सहज नष्ट होत नाहीत. त्यामुळे ते स्वयंपाकासाठी सुरक्षित पर्याय मानले जाते. विशेषतः तळणे किंवा फोडणी देण्यासाठी घीचा वापर योग्य ठरतो.

त्वचेसाठी फायदेशीर

मर्यादित प्रमाणात तूपाचं सेवन केल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. तसंच केसांना नैसर्गिक चमक येण्यास मदत होते. याशिवाय त्यातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं.

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

Maratha cavalry strength
येथे क्लिक करा