Surya Namaskar: दररोज सूर्यनमस्कार केल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

Surabhi Jayashree Jagdish

फीटनेस

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला फिट आणि निरोगी राहायचं असतं. अशा वेळी सूर्यनमस्कार हा एक सोपा आणि प्रभावी व्यायाम ठरतो. यासाठी कोणत्याही मशीनची गरज लागत नाही.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा फक्त योगाचा प्रकार नसून संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामुळे शरीरातील प्रत्येक स्नायू एक्टिव्ह होतो. दररोज केल्यास शरीर अधिक तंदुरुस्त राहतं.

१२ योगासनं

सूर्यनमस्कारामध्ये 12 योगासनांचा समावेश असतो. एक पूर्ण फेरी केल्यावर संपूर्ण शरीर कार्यरत होते. यामुळे शरीरात ऊर्जा आणि चपळता वाढते

एका फेरीत किती कॅलरीज होतात बर्न?

सूर्यनमस्काराच्या एका फेरीत साधारण 10 ते 15 कॅलरी बर्न होतात. जर 10 फेऱ्या केल्या तर 100 ते 150 कॅलरी कमी होऊ शकतात. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

सलग 30 मिनिटं

सलग 30 मिनिटे सूर्यनमस्कार केल्यास 200 ते 350 कॅलरीपर्यंत बर्न होऊ शकतात. हा व्यायाम शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. नियमित सरावामुळे शरीर सडपातळ दिसू लागतं.

मेटाबॉलिझम सुधारतं

दररोज सूर्यनमस्कार केल्याने मेटाबॉलिझम वेगाने काम करू लागतो. यामुळे शरीरातील फॅट लवकर कमी होण्यास मदत होते. पचनक्रियाही सुधारते आणि शरीर अधिक एक्टिव्ह राहतं.

मानसिक आरोग्य

सूर्यनमस्कार फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामुळे तणाव आणि थकवा कमी होतो. शरीर आणि मन दोन्ही निरोगी व शांत राहतात.

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा