Surabhi Jayashree Jagdish
व्यक्तीचं वजन जितकं जास्त, तितक्या जास्त कॅलरीज सायकलिंगमध्ये बर्न होतात. साधारण 50 किलो वजनाच्या व्यक्तीला 30 मिनिटांत सुमारे 150 ते 200 कॅलरीज बर्न होतात. तर 70 ते 80 किलो वजनाच्या व्यक्तीला 200 ते 300 कॅलरीजपर्यंत खर्च होऊ शकतात.
हलक्या वेगाने म्हणजे आरामात सायकल चालवल्यास कॅलरी बर्न कमी असतो. अशा वेगाने 30 मिनिटांत साधारण 120 ते 180 कॅलरीज बर्न होतात. हे मुख्यतः वॉर्म-अप किंवा रीलॅक्स राइडसाठी उपयुक्त असते.
मध्यम वेगाने सायकल चालवल्यास शरीर अधिक ऊर्जा वापरतं. 30 मिनिटांत साधारण 200 ते 300 कॅलरीज बर्न होऊ शकतात. हा वेग फिटनेस आणि फॅट लॉससाठी सर्वात प्रभावी मानला जातो.
सपाट रस्त्यावर सायकल चालवणं सोपं असतं कॅलरी बर्न थोडा कमी असतो. डोंगराळ किंवा चढ-उतार असलेल्या रस्त्यावर कॅलरी बर्न जास्त होतो. कारण अशा ठिकाणी शरीराला अधिक ताकद वापरावी लागते.
तरुण आणि फिट व्यक्तींमध्ये कॅलरी बर्न थोडा जास्त वेगाने होतो. जास्त वय किंवा कमी फिटनेस असलेल्या व्यक्तींमध्ये तो तुलनेने कमी असू शकतो.
नियमित सायकल चालवल्यास वजन कमी होण्यास मदत होतं. हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि स्टॅमिना वाढतो. तसंच शरीर टोन होऊन एकूण फिटनेस सुधारतो.