Manasvi Choudhary
रक्षाबंधन म्हणजे बहीण- भावाच्या अतूट नात्याचा सण आहे.
रक्षाबंधन या सणाला बहीण भावाच्या हातावर राखी बांधते त्याच्या रक्षणासाठी मनापासून प्रार्थना करते.
पण हातात राखी किती दिवस ठेवावी? हे तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे.
शास्त्रानुसार, राखीपौर्णिमेनंतर एक आठवडा राखी हातात असावी.
राखी हा केवळ एक धागा नसून तो रक्षणसूत्र असतो.
अनेकजण श्रावण महिना संपेपर्यत राखी ठेवतात. तर काही जण जन्माष्टमी म्हणजेच दहीहंडी येईपर्यंत राखी ठेवतात.
काहीजण वर्षभर देखील राखी हातात ठेवतात. मात्र राखीचा धागा जुना झाला की नकारात्मक ऊर्जा येते यामुळे योग्य वेळी राखीचे विसर्जन करणं योग्य आहे.
राखी कधीही कचऱ्यात टाकू नये ती झाडाला बांधावी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करणे योग्य असेल.
परंपरेनुसार राखी तीन दिवस तर कोणी महिनाभर ठेवतात. पण राखी किती दिवस ठेवणं यापेक्षा राखी भावाच्या हातात प्रेमाने आणि श्रद्धेने बांधणे याला महत्व आहे.