How Long Should Walk Daily: फिट राहण्यासाठी रोज किती वेळ चालावं? ३० मिनिटे, ४५ मिनिटे की १ तास; जाणून घ्या फायदे

Shruti Vilas Kadam

रोज ३० मिनिटे चालणं पुरेसं आहे का?

सुरुवातीसाठी रोज ३० मिनिटे वेगाने चालणं हा चांगला पर्याय आहे. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Walk

रोज ४५ मिनिटे चालण्याचे फायदे

तुम्हाला ३० मिनिटे चालण्याची सवय झाली असेल, तर ४५ मिनिटांपर्यंत वेळ वाढवू शकता. यामुळे दैनंदिन शारीरिक हालचाल वाढते आणि अधिक एनर्जी जाते.

Walk | pinterest

रोज १ तास चालणं गरजेचं आहे का?

निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने रोज एक तास चाललंच पाहिजे, असं नाही. मात्र, तुमची क्षमता चांगली असेल आणि वे असेल, तर एक तास चालणं शारासाठी फायदेशीर ठरू शकते.

Walk | saam tv

हृदयाच्या आरोग्यासाठी किती चालावं?

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्याला किमान १५० मिनिटे म्हणजेच आठवड्यातून पाच दिवस ३० मिनिटे वेगाने चालणं गरजेचे आहे. नियमित चालण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांना फायदा होतो.

Walk | saam tv

वजन कमी करण्यासाठी किती वेळ चालावं?

वजन कमी करण्यासाठी ३० ते ६० मिनिटे चालणे गरजेचे आहे. मात्र, वजन कमी होण्याचं प्रमाण चालण्याचा वेग, एकूण शारीरिक हालचाल, आहार आणि झोप यावर अवलंबून असतं.

Walk | pinterest

चालण्याचा वेग किती असावा?

चालण्याचा वेग मध्यम असावा. चालताना बोलता येईल एवढा वेग ठेवावा. सुरुवातीला हळू चालून नंतर वेग वाढवा.

Walk

सकाळी चालावं की संध्याकाळी?

सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला नियमितपणे चालता येईल अशी वेळ निवडा. व्यायामासाठी एकच वेळ सर्वांसाठी सर्वोत्तम असते, असं नाही.

Walk | canva

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Walk | saam tv

Running or Swimming: हृदय निरोगी ठेवण्यासाठी धावणं की पोहणं? कोणता व्यायाम ठरतो अधिक फायदेशीर?

Running or Swimming | Saam Tv
येथे क्लिक करा