Surabhi Jayashree Jagdish
लघवी ही शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. काही तज्ज्ञांच्या मते, लघवीनंतर लगेच भरपूर पाणी पिण्याऐवजी थोडा वेळ थांबणं अधिक योग्य ठरू शकते.
असे काही दावे केले जातात की, लघवीनंतर लगेच पाणी प्यायल्यास किडनीला अतिरिक्त फिल्टरिंग करावं लागतं. प्रत्यक्षात निरोगी किडनी शरीरातील पाण्याचं प्रमाण सतत नियंत्रित करत असतं आणि गरजेनुसार कार्य करते.
सोडियम, पोटॅशियम आणि इतर खनिजांचं संतुलन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. सामान्य परिस्थितीत लघवीनंतर पाणी प्यायल्याने हे संतुलन लगेच बिघडतं. मात्र अतिप्रमाणात पाणी पिल्यास काही परिस्थितींमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडण्याची शक्यता असू शकते.
काही लोकांना भरपूर पाणी एकदम प्यायल्यानंतर पोट फुगल्यासारखं किंवा अस्वस्थ वाटू शकतं. लघवीनंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे अॅसिडिटी किंवा अपचन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकदम जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास काही वेळात पुन्हा लघवीची भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्यांना ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर किंवा वारंवार लघवीची समस्या आहे, त्यांनी एकावेळी जास्त पाणी पिणं टाळावं.
लघवीनंतर सुमारे १० ते १५ मिनिटांचा अवधी ठेवून पाणी पिण्याचा सल्ला देतात. जर खूप तहान लागली असेल तर एक-दोन घोट पाणी पिण्यात कोणतीही अडचण नसते.
दिवसभर शरीराच्या गरजेनुसार नियमित पाणी पिणं ही सर्वात महत्त्वाची सवय आहे. एकावेळी संपूर्ण ग्लास पाणी पिण्याऐवजी हळूहळू पाणी पिणं योग्य आहे.
ही माहिती केवळ जागरूकता आणि सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.