Surabhi Jayashree Jagdish
मच्छरांमुळे जगभरात जवळपास सर्वच जण त्रासलेले आहेत.
पावसाळा आला की, मच्छारांची संख्या अधिक वाढते आणि त्यांच्यामुळे अधिक रोगंही पसरतात.
आज जाणून घेऊया मच्छरांचं आयुष्य किती असतं?
मच्छरांचं आयुष्य त्यांचं लिंग आणि प्रजातीवर अवलंबून असतं.
मादी डास जवळपास ४२ ते ५६ दिवस जीवंत राहतो
तर नर डास केवळ १० ते १५ दिवस जीवंत राहतो.
मादी डास पाण्यावर अंडी घालतात. ही अंडी काही दिवसात अळ्यांमध्ये रूपांतरित होतात. यातून बाहेर पडल्यानंतर अळ्या पाण्यात पोहतात.