Pizza digestion time: पिझ्झा खाल्ल्यानंतर तो पचायला किती वेळ लागतो?

Surabhi Jayashree Jagdish

पिझ्झा पचायला किती वेळ लागतो?

पिझ्झा पचण्यासाठी साधारणपणे ६ ते ८ तासांचा कालावधी लागू शकतो. हा वेळ व्यक्तीचं वय, चयापचय आणि खाल्लेल्या पिझ्झाच्या प्रमाणानुसार कमी-जास्त होऊ शकतो. पिझ्झामधील मैदा, चीज आणि फॅटमुळे पचनाची गती तुलनेने कमी होते.

Digesting pizza | saam tv

पचन प्रक्रिया का मंदावते?

पिझ्झामध्ये असलेले मैदा, चीज आणि जास्त प्रमाणातील चरबी पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणू शकतात. जास्त फॅटयुक्त अन्न पोटातून लहान आतड्यात जाण्यास अधिक वेळ घेतं. त्यामुळे पोट भरल्याची भावना आणि जडपणा अधिक काळ टिकू शकतो.

Pizza health tips | saam tv

पचनाची सुरुवात कशी होते?

पिझ्झा खाल्ल्यानंतर त्याचे पचन सर्वप्रथम पोटात सुरू होते. पोटातील आम्ल आणि पाचक एन्झाइम्स अन्नाचे लहान तुकड्यांमध्ये विघटन करतात. त्यानंतर हे अन्न पुढील पचनासाठी लहान आतड्याकडे जातं.

Pizza stomach digestion | saam tv

पोषक घटक शरीरात कसे शोषले जातात?

पोटातून पुढे गेलेले अन्न लहान आतड्यात पोहोचते. तिछे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, चरबी आणि इतर पोषक घटकांचं शोषण होतं. हे पोषक घटक रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचवले जातात.

Cheese digestion | saam tv

कोणता पिझ्झा अधिक वेळाने पचतो?

जास्त चीज, अतिरिक्त टॉपिंग्स आणि मोठ्या आकाराचा पिझ्झा पचायला अधिक वेळ लागू शकतो. अशा पिझ्झामध्ये कॅलरी आणि चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचन प्रक्रिया आणखी संथ होण्याची शक्यता वाढते.

Refined flour digestion | saam tv

पिझ्झा खाल्ल्यानंतर काय टाळावं?

पिझ्झा खाल्ल्यानंतर लगेच झोपणं किंवा आडवं पडणं टाळावं. असे केल्यास अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास वाढू शकतो. जेवणानंतर काही काळ सरळ बसणं किंवा हलकी हालचाल करणं अधिक फायदेशीर ठरतं.

Gut health | saam tv

पचन सुधारण्यासाठी काय करावं?

पिझ्झा खाल्ल्यानंतर १० ते १५ मिनिटं हलकं चालणं पचनासाठी उपयुक्त ठरू शकतं. पुरेसं पाणी पिणं आणि पिझ्झा मर्यादित प्रमाणात खाणंही पचनसंस्थेला मदत करते.

Acid reflux after pizza | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Slow digestion | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा