Surabhi Jagdish
अंतराळाबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. मुळात हे जग आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे आणि त्याचे स्वतःचे नियम आहेत.
अंतराळात स्पेससूट आवश्यक आहे. तुम्हालाही हे माहिती असेल की, स्पेससूटशिवाय कोणीही अंतराळात जाऊ शकत नाही.
स्पेससूट अंतराळयान किंवा स्पेस स्टेशनच्या आत गरजेचं नसलं तरीही बाहेर पडण्यापूर्वी त्याचा वापर करावा लागतो.
जर तुम्ही स्पेससूटशिवाय अंतराळयानातून बाहेर पडलात तर श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो.
अंतराळात स्पेससूटशिवाय एखादी व्यक्ती अवघ्या 15 सेकंदात बेशुद्ध होऊ शकतो. याशिवाय 90 सेकंदांनंतर त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो.
अंतराळात रेडिएशन असून सूर्याच्या चार्ज पार्टिकल्सचा सामना देखील होऊ शकतो.
स्पेसएक्सच्या पोलारिस डॉन मिशन अंतर्गत, अंतराळवीरांनी 1400 किमी उंचीवर अंतराळात चालत इतिहास रचला होता.
'या' ग्रहावर २००० वर्ष जिंवत राहू शकतो व्यक्ती, तुम्हाला याचं नाव माहित आहे का?