Surabhi Jayashree Jagdish
सर्वात उंच प्राण्यांचा विचार केला तर आपण सर्वजण जिराफचं नाव घेऊ.
जिराफ जगातील सर्वात उंच प्राण्यांच्या यादीत उच्च स्थानावर आहे.
नर जिराफाची उंची 18 फूट आणि मादी जिराफाची उंची 14 फूटांपर्यंत असते.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जिराफ किती दिवस जगेल?
म्हणजे जिराफ किती वर्षे जगतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का?
तुमचा विश्वास बसणार नाही पण जिराफचे वय सिंहापेक्षा जास्त असू शकते.
जिराफ हा एक प्राणी आहे जो 25 वर्षांपर्यंत जगू शकतो. तर बंदिवासात त्याचे आयुष्य रेकॉर्ड 27 वर्षांपर्यंत असू शकते.