Nana Patekar Education: नाना पाटेकरांचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तनुश्री दत्ता

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मानसिक त्रास

व्हिडीओमध्ये तनुश्री दत्ता म्हणते की गेली अनेक वर्षे तिचा स्वतःच्या घरात मानसिक त्रास होत आहे.

तनुश्री दत्ताचा आरोप

तनुश्री दत्ताने आरोप केला की नाना पाटेकर आणि त्यांच्या टोळीने तिला त्रास दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते

नाना पाटेकर, मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर, हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात.

गाजलेला चित्रपट

नाना पाटेकर यांनी विविध भूमिका साकारल्या असून 'नटसम्राट' हा त्यांचा मराठी चित्रपट विशेष गाजलेला आणि प्रशंसित ठरला आहे.

जन्म

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातील मुरुड-जंजिरा या ठिकाणी झाला होता.

शिक्षण

नाना पाटेकर यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले आणि त्यांना स्केचिंग करण्याची विशेष आवड होती.

नाट्यस्पर्धांमध्ये अभिनय

शिक्षण घेत असतानाच नाना पाटेकर यांनी कॉलेजमधील नाट्यस्पर्धांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली आणि रंगभूमीवरची वाटचाल सुरू झाली.

NEXT: वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असलेल्या गोपीचंद पडळकरांचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा