Dhanshri Shintre
काल विधानभवनात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि हाणामारी घडली.
हाणामारीनंतर वातावरण तापले असतानाच मध्यरात्री अटक प्रकरणावरून विधानभवनात मोठा गोंधळ आणि वाद निर्माण झाला.
गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी असून ते २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या जत मतदारसंघातून निवडून आले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी राजकीय कारकिर्दी राष्ट्रीय समाज पक्षातून सुरू केली आणि २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिली आमदारकीसाठी निवडणूक लढवली.
सांगलीमधील आटपाटी तालुक्यात गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण इयत्ता 12 वीपर्यंतच झालं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी अनेक निवडणुकांमध्ये पराभव भोगला, पण भाजपने विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांत संधी दिली आहे.
गोपीचंद पडळकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर लेखक आणि सिनेमा निर्मातेही आहेत, तसेच त्यांनी अभिनय क्षेत्रातही प्रयत्न केले आहेत.