Beed To Ratnagiri Travel: बीड ते रत्नागिरीचा प्रवास कसा कराल? जाणून घ्या मार्ग, वाहतूक सुविधा आणि उपयुक्त टिप्स

Dhanshri Shintre

अंतर किती?

बीड ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ५०० किलोमीटर असून गाडीने प्रवास करायचा असल्यास साधारण १० ते १२ तासांचा वेळ लागतो.

मुख्य मार्ग

खाजगी वाहनाने जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे बीड – अहमदनगर – पुणे – कोल्हापूर – रत्नागिरी NH-52, NH-60 आणि NH-166 या मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.

बस प्रवास

एसटी बसने प्रवास करायचा असल्यास बीडवरून पुणे किंवा कोल्हापूरपर्यंत एसटी बस पकडावी लागते आणि तिथून पुढे रत्नागिरीसाठी वेगळी बस घ्यावी लागते.

रेल्वेप्रवास

रेल्वे प्रवासासाठी बीडमध्ये थेट रेल्वे स्टेशन नसल्याने तुम्हाला औरंगाबाद किंवा पुणे या जवळच्या शहरांतून रत्नागिरीसाठी रेल्वे पकडावी लागेल.

सुविधा, हॉटेल्स

प्रवासात थांबे घेण्यासाठी पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये चांगल्या सुविधा, हॉटेल्स आणि फूड पॉइंट्स उपलब्ध आहेत.

घाटवाटा

कोल्हापूर ते रत्नागिरीदरम्यान घाटवाटा असल्याने वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः पावसाळ्यात खबरदारी घ्या.

मुसळधार पाऊस

पावसाळ्यात कोकणात मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे प्रवास करताना हवामानाचा अंदाज घेतल्यास अधिक सुरक्षित ठरेल.

गुगल मॅप

जीपीएस आणि Google Maps चा उपयोग करून आपण रूट सहज शोधू शकता, पण काही ठिकाणी नेटवर्क कमजोर असतो त्यामुळे हार्ड कॉपी मॅप ठेवा.

समुद्रकिनारे

रत्नागिरीत पोहोचल्यावर थंड हवामान, समुद्रकिनारे आणि कोकणी खाद्यपदार्थांचा अनुभव घ्यायला विसरू नका.

NEXT: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

येथे क्लिक करा