Surabhi Jayashree Jagdish
आजच्या काळात फोन हॅक होणे ही खूपच सामान्य गोष्ट झाली आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फोनच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
अशा स्थितीत चला जाणून घेऊया की तुमचा फोन हॅक झाला असेल तर तुम्हाला ते कसे ओळखता येईल. या गोष्टी समजून घेतल्यास वेळेवर उपाययोजना करता येतात.
तुमच्या फोनची बॅटरी अचानक आणि नेहमीपेक्षा खूप वेगाने कमी होऊ लागते. हे बहुतेकदा बॅकग्राऊंडमध्ये काही संशयास्पद अॅप्स किंवा प्रोसेस चालू असल्याचे संकेत असू शकतात. जर बॅटरी ड्रेन होण्याचं कोणतेही कारण नसेल तर हा इशारा दुर्लक्षित करू नका.
तुमचा फोन सामान्यपेक्षा जास्त गरम होत असेल तर तोही एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. हॅक झालेला फोन सतत डेटा पाठवत किंवा घेत असतो, त्यामुळे प्रोसेसरवर ताण येतो.
जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून सतत कॉल्स किंवा मेसेज येत असतील तर तोही एक इशारा असू शकतो. अशा प्रकारे स्पॅम किंवा फिशिंगद्वारे तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
फोनचा डेटा वापर अचानक खूपच वाढला असेल तर तोही एक संकेत असू शकतो. स्पायवेयर तुमची माहिती सर्व्हरवर पाठवत असल्याने डेटा सतत वापरला जातो. त्यामुळे डेटा वापरावर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुमचा फोन स्वतःहून रीस्टार्ट होत असेल तर तोही हॅक झाल्याचा संकेत असू शकतो. फोनमध्ये चालणाऱ्या मालवेअरमुळे सिस्टमवर ताण येतो आणि फोन रीस्टार्ट होऊ शकतो.
Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ