ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला आणि ते 'छत्रपती' बनले.
राज्याभिषेकानंतर महाराजांनी केवळ आपल्या राज्याचा विस्तारच केला नाही, तर आपल्या राज्याला स्थिरता आणि अधिकृतता मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमा हाती घेतल्या.
छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम ही सर्वात महत्त्वाची मानली जाते
राज्याभिषेकानंतर लगेचच, महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी खान्देशात छापे टाकले.
महाराजांनी विजापूरच्या ताब्यात असलेला गोव्याजवळील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा फोंडा किल्ला जिंकला.
मराठा नौदलाने जंजिऱ्याच्या सिद्दींवर हल्ला केला, परंतु या मोहिमेत त्यांना यश आलं नाही. सिद्दींचा सागरी दुर्गमपणा आणि मजबूत नौदल यामुळे हा किल्ला जिंकणं कठीण होतं.
ही महाराजांची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि दीर्घकाळ चाललेली मोहीम होती.