Manasvi Choudhary
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच टेडीबेअर आवडतात.
प्रेमीयुगुल देखील आपल्या पार्टनरला आवडीने टेडी देतात.
मात्र तुम्हाला हे टेडी नाव कसं पडलं हे माहितीये का?
२० व्या शतकात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट जंगलात शिकारीला गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत असिस्टंट होल्ट कॉलियर देखील होते.
यावेळी कॉलनने जंगलात एका जखमी अस्वलाला पकडून झाडाला बांधले होते. यावेळी जखमी अस्वलाला राष्ट्रपतींनी मारण्यास नकार दिला.
हे राष्ट्रपतीच्या उदारतेचे चित्र वृत्तपत्रामध्ये व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांना चित्रित केले.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले चित्र उद्योगपती मॉरिस मिचटॉन यांनी पाहले आणि अस्वलाच्या आकारात खेळणं बनवण्याचा विचार केला.
ज्याची रचना त्याच्या पत्नीने केली म्हणून या खेळण्याला टेडी असे नाव देण्यात आले.