Maratha History: छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर पेशव्यांचा उदय कसा झाला?

Surabhi Jayashree Jagdish

संभाजी महाराजांचे निधन आणि मराठा स्वातंत्र्ययुद्ध

संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केल्यानंतर मराठा साम्राज्यावर मोठे संकट आलं. यानंतर मराठ्यांनी छत्रपती राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १८ वर्षे कडवा संघर्ष केला, ज्याला 'मराठा स्वातंत्र्ययुद्ध' म्हटलं जातं.

शाहू महाराजांची सुटका

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बहादुरशाहने छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना मुघल कैदेतून मुक्त केलं. यावेळी मुघलांचा हेतू मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा होता.

शाहू महाराज आणि ताराबाईंमधील सत्तासंघर्ष

महाराष्ट्रात परतल्यावर शाहू महाराजांना राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. ताराबाईंनी त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा याला छत्रपती म्हणून घोषित केलं होतं. यावेळी दोघांमध्ये मराठा सिंहासनासाठी तीव्र सत्तासंघर्ष सुरू झाला.

बाळाजी विश्वनाथ भट

याचवेळी मुत्सद्दी आणि दूरदृष्टीचे ब्राह्मण सरदार बाळाजी विश्वनाथ भट यांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला. त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूने अनेक मराठा सरदारांना एकत्र आणलं.

पेशवेपदी नेमणूक

बाळाजी विश्वनाथांच्या अपार आणि निष्ठावान कार्यामुळे प्रभावित होऊन शाहू महाराजांनी त्यांना १७१३ मध्ये 'पेशवे' म्हणजेच मुख्य प्रधान म्हणून नियुक्त केलं. या नियुक्तीमुळे पेशवेपद अधिकृतपणे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचं पद बनलं.

पेशवेपदाचं बळकटीकरण

बाळाजी विश्वनाथांनी पेशवेपदाची केवळ प्रशासकीय भूमिकाच नव्हे, तर त्याला मराठा साम्राज्याचं वास्तविक कार्यकारी सत्ता केंद्र बनवलं.

पेशवेपदाचे वंशज

बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्यांचा कर्तबगार पुत्र थोरले बाजीराव पेशवे (पहिला बाजीराव) यांना पेशवेपदी नियुक्त केले. यामुळे पेशव्यांचं महत्त्व वाढलं.

पेशव्यांचा प्रभाव

थोरले बाजीराव पेशवे आणि त्यानंतर बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. मराठा सत्तेचा दबदबा करत या काळात पेशवेच मराठा साम्राज्याचे वास्तविक प्रशासक आणि सेनानी बनले.

Marathi History: 'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असं का म्हटलं जातं?

येथे क्लिक करा