Dhanshri Shintre
१ जुलै १९२४ रोजी खार रोड स्टेशनची सुरूवात झाली, उपनगरातील खार परिसरात रेल्वे सेवा पोहोचवण्याचा उद्देश होता.
'खार' हा शब्द मराठीतील 'खारा' या शब्दावरून घेतला असून, तो त्या भागातील खारट जमिनीचा संदर्भ देतो.
शतकांपूर्वी, खार दांडामध्ये लोकांनी मिठागरे उभारून मीठ तयार केल्याने या परिसराला 'खार' असे नाव मिळाले.
"खार-दांडा" हे नाव किनाऱ्यावरील पारंपरिक मच्छीमार कोळीवाड्यावरून पडले, जिथे कोळी समाज पूर्वीपासून वास्तव्यास होता.
वांद्रे स्टेशन लांब असल्याने खारमधील नागरिकांची सोय आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खार स्टेशन उभारण्यात आले.
बीडीडीने खारमध्ये १०,००० लोकांसाठी ८४२ इमारतींसाठी भूखंड विकसित केला; जवळचे स्टेशन योजनेच्या यशासाठी महत्त्वाचे ठरले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील खार स्टेशन हे त्या १० स्थानकांपैकी एक आहे, जिथे मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू आहेत.
११ जुलै २००६ च्या मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटांत खार रोड स्टेशनलाही गंभीर फटका बसलेला होता, अनेक निष्पाप जीव गेले.