Manasvi Choudhary
पनवेल रायगड जिल्ह्यातील मुख्य शहर आहे.
पनवेल हे एक विकसित शहर म्हणून देखील ओळखले जाते. पनवेल महानगरपालिका सर्वात पहिला नगरपालिका आहे.
पनवेलला कोकणाचा प्रवेशद्वार मानला आहे. मुंबई- गोवा, मुंबई- पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेलच्या दिशेने आहेत.
पनवेल हा आगरी- कोळी संस्कृती लाभलेला ऐतिहासिक शहर आहे.
मुघल, इंग्रज, पोर्तुगीज आणि मराठ्यांनी पनवेलवर राज्य केले आहे. पनवेलमध्ये पेशवाई कालीन वाडे आहेत.
पनवेल हे शहर गाढी नदीवर वसलेले आहे. पूर्वीचे पनवेलचे नाव पवनपल्ली असे होते. पुढे ते पर्णवेला, पानवेला व पानवेल अशा भिन्न नावांनी ओळखले जाऊ लागले.
पुढे पनवेलच्या बंदरातून परदेश व्यापार चालायचा. त्यांचे अधिकारी कागदपत्रांत या गावाचा उल्लेख पण्यवेला असा करीत होते.
पाण्याच्या काठावर वसलेल्या असल्याने पण्यवेला असे नाव पडले मात्र नंतर शाब्दिक भाषेत पनवेल असे नाव झाले.