Sakshi Sunil Jadhav
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते.
श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी घरातल्या दिव्यांची पूजा केली जाते.
दीप अमावस्यायेला घरात वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची पूजा करण्याचा हा सण आहे.
दीप अमावस्येला चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे.
घरात सुख समृद्धी नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन केले जाते.
दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ धुवून पुसून घेतात.
देवासमोर एक पाट मांडून त्याच्या भोवती रांगोळी काढली जाते.
पाटावरती दिवे मांडावे लागतात. त्यांना हळद-कुंकू लावून पूजा करावी लागते.
फुलं वस्त्रमाळ हे दिव्यांवरती वाहा. मग दिवे पेटवून त्यांना नमस्कार करावा. लहान मुलांची पीठाच्या दिव्याने पूजा केली जाते. त्याने दृष्ट लागत नाही.
दिव्यांची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि माणूस अंधाराकडून प्रकाशाकडे जातो.
NEXT : कबुतराचा कुरकुरण्याच्या आवाजाचे संकेत काय? जाणून घ्या आनंदाची बातमी