Saam Tv
रोज चालण्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल वाढते आणि फिटनेस, सहनशक्ती व सक्रिय जीवनशैली विकसित होण्यास मदत होते.
किशोरवयीन मुले रोज जितके जास्त पावले चालतात, एका वर्षानंतर त्यांच्यातील मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या तितक्याच कमी दिसून येतात.
जे टीनेजर्स दिवसभरात 12000 किंवा त्याहून अधिक पावले चालल्याने त्यांच्यात वर्तवणूक आणि भावनांशी संबंधित समस्या सर्वात कमी आढळतात.
शारीरिक हालचालींमुळे मेंदू आणि मानसिक आरोग्यावर थेट सकारात्मक परिणाम होतो .
किशोरवयीन मुले सर्वात जास्त चालत असतात, त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये कॉर्टिकल टिश्यू अधिक जास्त पाहायला मिळतो. जे मानवी हालचाली आणि भावनांवर नियंत्रण ठेवतात.
किशोरवयीन मुलगा/मुलगी आपल्या दैनंदिन चालण्यात फक्त 1000 ते 2000 पावले जरी वाढवत असेल, तरीही त्याच्या मेंदूच्या रचनेत आणि मानसिक आरोग्यामध्ये उत्तम बदल पाहायला मिळतात.
शारीरिक हालचालींचा मेंदू आणि मानसिक आरोग्य या दोन्हींना थेट फायदा होतो, हे पाहून खूप प्रोत्साहन मिळते.
चालणे ही 'एकतर सर्वकाही किंवा काहीच नाही' अशी परिस्थिती नाही. म्हणजेच, हे फायदे मिळवण्यासाठी किशोरवयीन मुलांना उत्कृष्ट खेळाडू असण्याची गरज नाही.