6 Exercise For Belly Fat: पोट सुटलंय, ढेरी कमी करण्यासाठी घरातच करा हे ६ प्रकारचे व्यायाम

Manasvi Choudhary

पोटाची ढेरी वाढणे

आजकाल बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने पोटाचा घेर, ढेरी वाढण्याचा त्रास वाढला आहे. याासाठी अनेकजण जिम लावतात पण जिमचा खर्च अधिक असतो.

6 Exercise For Belly Fat | google

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 6 व्यायाम

जर तुम्हालाही जिम न लावता घरच्या घरी पोटाची चरबी कमी करायची असेल, तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही 6 व्यायाम करू शकता.

Belly Fat Loss Exercise

एल्बो क्रंच एक्सरसाइज

एल्बो क्रंच एक्सरसाइज या व्यायाममुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

कसा करावा हा व्यायाम

डोक्यामागे दोन्ही हात ठेवून सरळ उभे राहा.

त्यानंतर उजवा गुडघा वर उचला आणि डावा कोपर खाली आणून गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा.

हीच कृती दोन्ही बाजूंनी किमान १० वेळा करा.

Elbow Crunch Exercise | Saam Tv

साईड बेंड एक्सरसाइज

साईड बेंड एक्सरसाइज हा व्यायाम केल्याने पोटाच्या बाजूची चरबी कमी होते आणि शरीरात लवचिकता येते.

Side Bend Exercise

कसा करावा व्यायाम

खांद्यांच्या रुंदीइतके पाय लांब ठेवून सरळ उभे राहा.

एक हात कंबरेवर ठेवा आणि दुसरा हात वर करा.

आता हळूहळू एका बाजूला वाका आणि पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत या.

हा व्यायाम दोन्ही बाजूंनी आलटून-पालटून करा.

Side Bend Exercise

टॉर्सो ट्विस्ट

टॉर्सो ट्विस्ट या व्यायामामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात आणि पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

Torso Twist Exercise

कसा करावा व्यायाम

पाय थोडे अंतर ठेवून उभे राहा आणि दोन्ही हात पुढे आणा.

आता तुमचे शरीर एका बाजूने दुसऱ्या बाजूला हळूहळू वळवा.

व्यायाम करताना पोटाचे स्नायू ताणलेले ठेवा.

Torso Twist Exercise

हाय नीज

हाय नीज हा एक अत्यंत सोपा कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाची गती वाढते, कॅलरीज लवकर बर्न होतात आणि पोटाची चरबी घटते.

कसा करावा व्यायाम

सरळ उभे राहून जागेवरच जॉगिंग सुरू करा.

जॉगिंग करताना एक-एक करून गुडघे शक्य तितक्या छातीच्या दिशेने वर उचला.

High Knees Cardio

स्टँडिंग बायसिकल क्रंच

स्टँडिंग बायसिकल क्रंच या व्यायामामुळे पोटाच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांच्या स्नायूंवर उत्तम प्रभाव पडतो.

Standing Bicycle Crunch

कसा करावा हा व्यायाम

दोन्ही हात डोक्यामागे ठेवून उभे राहा.

त्यानंतर उजवा कोपर विरुद्ध बाजूच्या डाव्या गुडघ्याला लावा.

अशाच प्रकारे बाजू आलटून-पालटून हा व्यायाम सतत सुरू ठेवा.

Strenuous exercise | pinterest

स्टँडिंग लेग रेझ

स्टँडिंग लेग रेझ हा व्यायाम केल्याने पोटाच्या खालच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.

Standing Leg Raises | pinterest

कसा करावा हा व्यायाम

सरळ उभे राहून एक पाय हळूहळू सरळ वरच्या दिशेने उचला आणि नंतर खाली आणा.

हा व्यायाम दोन्ही पायांनी आलटून-पालटून १० ते १५ वेळा करा.

Standing Leg Raises | pinterest

NEXT: Saree Styling Tips For Woman: साडी नेसण्यासाठी पेटीकोटची गरज नाही! लेगिंग्जपासून पलाझोपर्यंत ‘हे’ पर्याय ठरतील बेस्ट

Saree Styling Tips For Woman
येथे क्लिक करा...