Surabhi Jayashree Jagdish
तोंडात किंवा ओठांवर जखम झाली आणि ती बरी होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. साधारण दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जखम राहिली तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. अशी जखम कॅन्सरचं एक लक्षण असू शकते.
जीभ, हिरड्या किंवा गालाच्या आत पांढरे किंवा लाल डाग दिसू शकतात. काही वेळा लाल-पांढरा असा डाग दिसतो. असे डाग बराच काळ राहिल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
तोंडाच्या आत, ओठांवर, हिरड्यांमध्ये किंवा गालाच्या आत गाठ किंवा सूज जाणवू शकते. तोंडातील एखादा भाग नेहमीपेक्षा जाड किंवा कडक वाटत असेल तरी त्याची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. मात्र प्रत्येक गाठ कॅन्सरमुळेच होतं असं नाही.
तोंडात किंवा जीभेवर सतत दुखत असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. कोणतंही कारण नसताना तोंडातून रक्त येणं हेही लक्ष देण्यासारखं लक्षण आहे. तोंडाच्या एखाद्या भागात बधिरपणा किंवा संवेदना कमी होणं जाणवत असेल तरी तपासणी करून घ्या.
तोंड पूर्ण उघडताना किंवा जबडा हलवताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अन्न चावताना किंवा गिळताना सतत त्रास किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशी लक्षणं इतर कारणांमुळेही होऊ शकतात.
कोणतंही स्पष्ट कारण नसताना दात सैल होणं हे तोंडाच्या कॅन्सरच्या संभाव्य लक्षणांपैकी एक असू शकतं. मानेत नवीन गाठ किंवा सूज जाणवणं हेही दुर्लक्ष करण्यासारखं नाही. अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.