Saam Tv
नॉन स्टिक पॅनमुळे जेवण करणे सोपे होते. पदार्थ पॅनला चिकटतही नाही. मात्र काही चुकांमुळे पॅनची कोटिंग खराब होते. पुन्हा मग तो पॅन वापरताही येत नाही. या चुका करत असाल तर आजच थांबवा.
नॉन स्टिक पॅन रिकामा ठेवून मोठ्या आचेवर बराच वेळ गरम करू नका. जास्त तापल्यामुळे त्याच्या कोटिंगवर परिणाम होतो.
नॉन स्टिक पॅनसाठी स्टीलचा चमचा वापरणे धोकादायक आहे.त्यामुळे पॅनवर ओरखडे पडतात. त्याऐवजी पॅन सोबत मिळालेला लाकडी, सिलिकॉन, नायलॉनचा चमचा वापरणेच योग्य आहे.
पॅनमध्ये पदार्थ चिकटला म्हणून तारेच्या काथ्याने जोरात घासू नका. त्यामुळे कोटींगला ओरखडे पडतात आणि कोटींग खराब होते. पॅन घासताना मऊ स्पंज किंवा किशीचा वापर करावा.
गरम पॅनवर लगेच थंड पाणी ओतल्यामुळे कोटिंगवर परिणाम होतो आणि कोटींग खराब होते.
जेवण केल्यानंतर ते नॉन स्टिक पॅनमध्येतच साठवून ठेवू नका. जेवणातील आंबट गोड पदार्थांच्या गुणधर्मामुळे कोटींगवर परिणाम होतो.
स्वच्छ धुतल्यानंतर पॅन छान कोरडा करा. पुन्हा वापरेपर्यंत त्याला थोडे तेल लावून ठेवा. ज्यामुळे पॅनचे कोटिंग लवकर खराब होत नाही.