Manasvi Choudhary
मतमोजणीच्यावेळी निवडणूक अधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. या दिवशी अधिकाऱ्यांचं पोस्टिंग कोणत्याही जागी केलं जातं.
मतांची गुप्तता पाळण्यासाठी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी निवडणूक अधिकारी आणि उपनिवडणूक अधिकारी शपथ घेतात.
निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मतमोजणीपूर्वी EVM मशीनची तपासणी केली जाते.
मतमोजणी केंद्रावर असलेल्या प्रत्येक टेबल जवळ मतमोजणी पर्यवेक्षक आणि उमेदवारांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी असतो.
उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्राजवळ येण्याची आणि मतमोजणीवर लक्ष ठेवण्याची परवानगी असते.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी पर्यवेक्षक आणि प्रतिनिधी /उमेदवारांकडून सह्या घेतल्या जातात. यानंतर निवडणूक अधिकारी सही करतो.
निवडणूक अधिकाराच्या सहीनंतर निकाल जाहीर केला जातो.ही सर्व प्रक्रिया कॅमेराच्या देखरेखेखाली पार पडत असते.
मतमोजणी करताना प्रत्येक केंद्रावरील EVM मशीन VVPAT सिस्टमची तपासणी केली जाते.
EVM मशीन आणि VVPAT सिस्टममध्ये फरक जाणवल्यास पुन्हा एकदा मोजणी केली जाते मात्र यावेळी स्लीपवरची निवडणूक चिन्ह ग्राह्य धरल्या जातात.