ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्लँकेट, चादर आणि इलेक्ट्रिक हीटरचा शोध लागण्यापूर्वीही, लोक हिवाळ्यात थंडीपासून संरक्षणासाठी आणि उबदार राहण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करत होते.
ब्लँकेट आणि चादर उपलब्ध पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे? जाणून घ्या.
हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आग एक प्राथमिक स्रोत होता. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लोक गुहा किंवा झोपड्यांमध्ये शेकोटी पेटवायचे.
कपड्यांचा शोध लागण्यापूर्वी, मानव शरीराची उब टिकवून ठेवण्यासाठी प्राण्यांची कातडी आणि लोकर वापरायचा. शिकारी अस्वल, लांडगे आणि हरण यांसारख्या प्राण्यांच्या कातडीपासून त्यांचे कपडे बनवायचे.
लोकर, चामडे आणि सुती कपडे थंडीपासून संरक्षण देत असत. म्हणून शरीर उबदार ठेवण्यासाठी मानव वेळोवेळी विविध प्रकारचे कपडे घालायचा.
थंडीपासून संरक्षणासाठी लोक गुह्यामध्ये राहायते. नंतर, मानवांनी माती, दगड आणि लाकडापासून जाड भिंतींची घरे बांधण्यास सुरुवात केली. रात्री उष्णता पसरवण्यासाठी झोपण्याच्या जागी गरम दगड देखील ठेवले जात होते.
काही लोक त्यांच्या खोल्या गरम ठेवण्यासाठी मातीच्या चुली वापरत असत. तसेच काही लोक एकमेकांच्या जवळ झोपायचे ज्यामुळे त्यागी उष्णता टिकून राहायची.