स्पेसमध्ये कसा तयार होतो ब्लॅक होल?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लॅक होल

अलीकडे पश्चिम अमेरिकेतील चायना लेकजवळ एक रहस्यमयी ब्लॅक होलसारखी आकृती दिसून आली आहे. ही घटना पाहणाऱ्यांमध्ये मोठी कुतूहल निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी याबद्दल अधिक माहिती शोधण्यास सुरुवात केली आहे.

कसा तयार होतो?

तुम्हाला माहिती आहे का की अवकाशात ब्लॅक होल कसा तयार होतो? ब्लॅक होल म्हणजे असे क्षेत्र जिथे गुरुत्वाकर्षण इतके प्रबळ असते की प्रकाशदेखील बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या निर्मितीची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते.

निर्माण

ब्लॅक होलचा निर्माण संपुष्टात आलेल्या तार्‍यांपासून होतो. मोठे तारे जेव्हा आपले इंधन संपवतात तेव्हा ते स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे कोसळतात. या कोसळण्यामुळे ब्लॅक होल तयार होतो.

कारणं अद्याप अस्पष्ट

एका संशोधनात आढळले की आधी ब्लॅक होल अत्यंत वेगाने तयार होत होते, पण आता त्यांची निर्मितीची क्षमता कमी झाली आहे. यामागील कारणे अद्याप स्पष्ट नाहीत. वैज्ञानिक या बदलांचा अभ्यास करत आहेत.

कारणं

ब्लॅक होल अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी तयार होऊ शकतात. कधी ते तार्‍यांच्या कोसळण्याने बनतात तर कधी दोन ब्लॅक होलच्या विलिनीकरणातून निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या उत्पत्तीचे स्वरूप विविध असू शकते.

आकाशगंगा

जेव्हा दोन आकाशगंगा एकमेकांना धडकतात तेव्हा ब्लॅक होल एकमेकांमध्ये विलीन होऊ शकतात. या प्रक्रियेत त्यांचे आकार आणि शक्ती दोन्ही वाढतात.

ब्लॅक होलची वाढ

एखाद्या ब्लॅक होलची वाढ लाखो वर्षे त्याच्या आकाशगंगेमधील द्रव्यमानावर अवलंबून असते. जितके अधिक द्रव्यमान, तितकी ब्लॅक होलची वाढ जलद होते.

वैज्ञानिकांचं संशोधन

पण ब्लॅक होलबद्दल वैज्ञानिकांचं संशोधन अजूनही सुरूच आहे. या गूढ वस्तूंबद्दल बरीच माहिती मिळाली असली तरी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा