ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात गरमा गरम सूप प्यायला एक वेगळीच मज्जा येते. अनेक प्रकारचे सूप घरी बनवता येतात पण, स्वीट कॉर्न सूप हे जवळपास सगळ्यांनाच आवडते.
स्वीट कॉर्न सूप हे घरच्या घरी सोप्या पध्दतीने बनवले जाऊ शकते. जाणून घ्या सोपी रेसिपी
मक्याचे दाणे, कांदा, लसून- आले, आवडणाऱ्या भाज्या, मीठ, काळी मिरी आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
सर्वात आधी मक्याच्या दाण्यांना उकडून घ्या. उरलेले दाणे तसेच ठेवा आणि त्याची बारिक पेस्ट बनवून घ्या.
आता पॅनमध्ये थोडे तेल टाकून कांदा, लसून आणि आले हलकेसे परतवून घ्या. त्यावर तुमच्या आवडीच्या भाज्या टाका आणि त्या मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
यानंतर तयार केलेली स्वीट कॉर्न पेस्ट टाका आणि त्यात थोडे पाणी टाकून उकळवून घ्या.
चवीनुसार मीठ , काळी मिरी आणि साखर टाकून शिजवून घ्या. तुम्हाला हवे असल्यास १ चमचा व्हिनेगर देखील टाकू शकता.
तुमचे स्वीट कॉर्न सूप तयार आहे. कोथिंबीर आणि क्रिम टाकून गरमा गरम सूप पिण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.