ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात बाजारात सगळीकडेच आवळे उपलब्ध असतात. आवळा हा सर्वांनाच खायला आवडतो. तसेच आवळ्याचे लोणचे, मुरब्बा आणि चटणी लोक खूप आवडीने खातात.
आवळा हा आरोग्यासोबत त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. आवळा खाल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
जर तुम्ही आवळा खात असाल तर, तुम्ही आवळ्याची चटणी देखील बनवून खाऊ शकता. जाणून घ्या रेसिपी
आवळे, कोथिंबीर, हिरवी मिरची, मोहरीचे तेल, मीठ आणि लसूण इत्यादी साहित्य लागते.
आवळे चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि लहान तुकडे करुन घ्या. आवळ्यातील बी काढून टाका.
हिरवी मिरची आणि कोथिंबीरीला बारीक कापून घ्या. तसेच काहि लसूनच्या पाकळ्या सोलून घ्या.
आता सगळे घटक मिक्सरमध्ये टाका आणि थोडे पाणी टाकून ब्लेंड करुन घ्या.
बारिक केलेल्या चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाका आणि २ ते ३ चमचे मोहरीचे तेल टाकून चटणी मिक्स करुन घ्या.
आवळ्याची चटपटीत चटणी तयार आहे. तुम्ही ही चटणी चपाती, भाकरी किंवा पोळ्या सोबत खाऊ शकता.