Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला मेदू वडा खायला सर्वानाच आवडतो.
मेदू वडा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मेदू वडा बनवण्यासाठी उडीद डाळ, मेथी दाणे, मूग डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, नारळ, कढीपत्ता, तांदूळ पीठ, मीठ तेल हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम उडीद डाळमध्ये मेथी दाणे घाला आणि मूग डाळ 4 ते 5 तास भिजवून घ्या.
नंतर मिक्सर च्या भांड्यात मूग डाळ, हिरवी मिरची आणि आले, मीठ घालून बारीक वाटून घ्या. व त्यात कढी पत्ता पाने चुरून घाला.
त्यात तांदूळ पीठ घाला संपूर्ण मिश्रण मिक्स करा.
त्यात थोड नारळ चव नीट मिक्स करा. पळी ला पाण्याचा हात लावा, त्यावर वाटलेले पीठ घाला आणि पाण्याचे बोट लावून त्यात मध्ये छिद्र करून घ्या
तेल तापवून घ्या व त्यात पळी वरचा वडा सोडा, व तळून घ्या व चटणी सांबार बरोबर सर्व्ह करा.