ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हालाही जेवणात काही तरी स्पेशल बनवायच असेल तर ही चटपटीत कढई पनीर रेसिपी नक्की ट्राय करा.
२५० ग्रॅम पनीर, ४ ते ५ टोमॅटो, २ कांदे, ३ शिमला मिरची, काश्मिरी मिरची, बेडगी मिरची, लसूण, आलं, काळी मिरी, तेल, लवंग, जीरे, हळद, लाल तिखट, आणि मीठ
आलं-लसूण, टोमॅटो, आणि काश्मिरी मिरची यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून प्युरी घ्या. तसेच एक बारीक कांदा चिरुन घ्या. आणि एक कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटोचे मोठे काप करा.
कढईमध्ये तेल गरम झाल्यावर यात जीरे, तेजपत्ता, लंवग, काळी मिरी आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. यात हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्या.
आता, यामध्ये टोमॅटो प्युरी आणि गरम मसाला घाला. तेल सुटेपर्यंत मसाला चांगले परतून घ्या.
एक पॅनमध्ये तेल घालून कांदा, शिमला मिरची आणि बेडगी मिरची घालून परतून घ्या. तसेच पनीर देखील फ्राय करुन घ्या. आणि मसालामध्ये मिक्स करा.
यामध्ये थोडे पाणी आणि मीठ, घालून १० मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या. आणि कोथिंबिराने सजवा. चटपटीत कढई पनीर तयार आहे. रोटी किंवा नानसोबत सर्व्ह करा.