पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

Manasvi Choudhary

गरमा गरम सूप

पावसात भिजल्यानंतर गरमा गरम सूप पिण्याची मज्जा वेगळीच असते. तुम्हाला देखील सूप प्यायचं असेल तर हेल्दी आणि टेस्टी ब्रोकोली सूप प्या.

Broccoli Soup Recipe

सोपी रेसिपी

ब्रोकोली सूप घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ब्रोकोली सूप बनवा.

Broccoli Soup Recipe

साहित्य

ब्रोकोली सूप बनवण्यासाठी ब्रोकोली, कांदा, कॉर्न, लसूण, काळी मिरी पावडर, मैदा, ऑलिव्ह ऑईल, बटर, गरम दूध, क्रिम, जायफळ पावडर हे साहित्य घ्या.

Broccoli Soup Recipe

दूध गरम करा

ब्रोकोली सूप बनवण्यासाठी सर्वातआधी दूध गरम करा. त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी आणि मीठ टाका आणि उकळून घ्या.

Broccoli Soup Recipe | Pintrest

ब्रोकोली आणि कॉर्न मिक्स करा

नंतर त्यात ब्रोकोली आणि कॉर्न मिक्स करा. हे मिश्रण चांगले शिजवून घ्या.

Brocoli

मिश्रण एकजीव करा

नंतर एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करा त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा मिक्स करा. मिश्रणात मैदा मिक्स करून चांगले परतून घ्या. नंतर या मिश्रणात उकडलेली ब्रोकोली आणि कॉर्न मिक्स करा.

Broccoli Soup Recipe

मिश्रणाची पेस्ट करा

संपूर्ण मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करा. तयार पेस्ट एका पातेल्यात काढून त्यात गरम दुध मिक्स करा आणि शिजवा

Broccoli Soup Recipe

मसाले मिक्स करा

या मिश्रणात काळे मिरी पावडर, जायफळ पावडर मिक्स करा आणि उकळून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घाला आणि क्रिम टाका.

spices | yandex

ब्रोकोली सूप तयार

अशाप्रकारे घरच्या घरी गरमा गरम ब्रोकोली सूप तयार करा.

Broccoli Soup Recipe

NEXT: पावसाळ्यात वारंवार आजारी पडता? मग हे 5 पदार्थ रोजच्या आहारात नक्की ठेवा

Monsoon Immunity Boost Food
येथे क्लिक करा...