Sakshi Sunil Jadhav
तब्येतीची काळजी घ्या. हितशत्रूंची वाढ होईल. मानसिकता जपा.
मनोरंजनात्मक कार्यामध्ये विशेष रस वाढेल. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. लक्ष्मी उपासना करावी.
वाहन सौख्य, गृह सौख्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. मनात ठरवलेल्या योजना तसेच पद्धतीने पार पडतील.
भावंडासौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. स्वप्नांना नवे पंख फुटतील. जवळचे प्रवास घडतील. दिवस संमिश्र आहे.
जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे आज गरजेचे आहे. ताण, त्रास येऊ नये त्यासाठी कुटुंबीयांची मदत आज मोलाची ठरेल.
श्रीराम कृपेने छान चालू आहे अशी भावना आज येईल. सकारात्मक लहरींनी भारलेला आजचा दिवस असेल.
करियर मध्ये महत्त्वाचा टप्पा पार पाडाल. पैशाचे व्यवहार जपून करावेत.
अनेक लाभ घेऊन आलेला आजचा दिवस आहे. सून, जावई जवळचे परिचित, मित्र मैत्रिणी, स्नेहीजन यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल.
समाजकारणामध्ये विशेष यश मिळेल. करिअरला नवीन दिशा सापडेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या क्षेत्रात मिळाल्यामुळे नवा हुरूप येईल.
शिव उपासना करावी. लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. दानधर्म अध्यात्म यामध्ये दिवस व्यस्त राहील.
जेवढे काम कराल तेवढेच कमवाल. पण कमवताना काळा पैसा नाही ना याचा चार वेळा विचार करा.
जोडीदाराबरोबर आनंदी क्षण उपभोगाल. कोर्ट कचेरीच्या गोष्टी असतील तर त्यामध्ये आज यश मिळेल. नवीन संकल्पना राबवायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे.