Sakshi Sunil Jadhav
व्यवहार करताना जपून करा. जमेत तितकं डोकं शांत ठेवून कामे करावीत.
जोडीदाराशी कसे वागावे कळेल. मनोरंजन क्षेत्रात प्रगती होईल.
ठरवलेली कामे पूर्ण होतील. अडचणीतून मार्ग काढावे लागतील.
कला क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होईल. संततीवर विशेष जीव जडेल.
जमिनीचे व्यवहार मनासारखे पार पडतील. सरकारी कामांमध्ये मात्र दिरंगाई जाणवेल. दिवस चांगला आहे.
भावंड सौख्यामध्ये भर पडेल. जवळच्या लोकांनी समजून घेतल्यामुळे कामासाठी वेगळा हुरूप येईल.
अडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. धनाशी निगडित गोष्टी घडतील.
मी आणि माझा असा काहीसा आजचा दिवस आहे. स्वतःच्या आनंदासाठी दिवस खर्च कराल.
दोलायमान मनस्थिती राहील. काही वेळा निर्णय घेण्यासाठी कचराई होईल.
परिचितांकडून लाभ होईल. जुन्या मित्र-मैत्रिणी भेटतील. प्रेमाला नवे पंख फुटतील.
समाजामध्ये आपली पद आणि प्रतिष्ठा वाढण्याचा दिवस आहे. करिअरच्या बाबतीत केलेल्या कामाचा योग्य मोबदला आज मिळेल.
दत्तगुरूंची उपासना करावी. आलेल्या गोष्टीतून चांगल्या असो अथवा वाईट मार्गक्रमण करण्यासाठी त्याची साथ लाभेल.