Rashi Bhavishya : आज या राशींना कर्मांचा मिळणार योग्य न्याय, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

आपल्या तब्येतीची काळजी घ्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा. एखाद्याकडून त्रास होऊ शकतो, त्यामुळे स्वतःला खंबीर करा.

मेष राशी | Saam TV

वृषभ

पैशाचे व्यवहार चांगले मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभाचे आज योग आहेत.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

घरातील लोकांची व्यवसायाला साथ मिळेल. एकत्रितरीत्या घेतलेले निर्णय पुढील गोष्टीसाठी फायदेशीर ठरेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

नवीन ओळखी आणि परिचय होऊन कामाच्या कक्षा रुंदावतील. महत्वाचे पत्रव्यवहार मार्गी लागतील.

कर्क राशी | Saam TV

सिंह

नकारात्मकता येत असेल तर ती झटकून टाका. घडतील त्या गोष्टी चांगल्याच होतील.

सिंह राशी | Saam TV

कन्या

आज आपले बदललेले रूप जगासमोर येईल. आपली वेगळी छाप इतरांवर पडेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा या हातून पैसे आले आणि त्या हातून निसटले अशी अवस्था होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

केलेल्या कर्मांचा योग्य न्याय आज मिळेल. खंबीरपणे अवघड गोष्टी सहज पार पाडाल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

शरीर आणि मन यांचा मेळ कदाचित आज बसणार नाही. मनाला वाटतं ते शरीराला जे पेलेलच असे होणार नाही.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

शिव उपासना फलदायी ठरेल.देवाने दिलेल्या गोष्टी आपल्या चांगल्या कर्मा प्रमाणेच मिळतात हे लक्षात ठेवा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

संभ्रमित अवस्था टाळण्यासाठी, आहे त्या गोष्टींचा स्वीकार करा. चांगल्या गोष्टी उद्यावर ढकललेल्या बऱ्या असे वाटते आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

सर्वांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा दिवस आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सुयश मिळेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : ऐकावं ते नवलच.. 'या' गावात कोणाच्याच घरात चूल पेटत नाही

Village In India | google
क्लिक करा