Sakshi Sunil Jadhav
श्रावण मासाची चाहूल नक्कीच आपल्या ओंजळीत पसाभर सकृत्य टाकेल. गणेश उपासना आज करावी.
मृत्यू भय विनाकारणच दाटून येईल. ठरलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. काहीतरी गूढ किंवा वेगळे करण्याचा आज अट्टाहास राहील.
तरुण आणि उमदा भागीदार घेऊन आज नव्याने व्यवसायाची सुरुवात कराल. दिवस चांगला आहे.
खराब पाणी अथवा अन्न यापासून स्वतःची काळजी घ्या. तब्येत बिघडण्याची दाट शक्यता आहे.
रवी उपासना करावी. कायमच आपण ताठ मानेने राहता आणि जगता. आज मात्र याचे चांगले पडसाद आपल्या आयुष्यात उमटतील.
अजूनही कामाला लागले नसाल तर आज पेटून उठा. प्रॉपर्टीशी निगडीत व्यवहारासाठी दिवस उत्तम आहे. कौटुंबिक सौख्य चांगले आहे.
बहिणीची विशेष माया लाभेल. सुंदर रमणीय वातावरणात जवळच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचे आज योग आहेत.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. एकटेपण खायला उठेल.
घोड्याप्रमाणे उमदी असणारी आपली रास. आज नवनवीन गोष्टी यांचे संकल्प करून त्या सत्यात उतरवण्याचा प्रयत्न कराल.आरोग्य उत्तम राहील.
विनाकारण बंधन योग येतील. आपल्याविषयी जवळचेच लोकं भांडं असतील. अफवांमध्ये भर पडेल.
प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे अस्तित्व जाणवेल. शेजारी संबंध दृढ होतील. मैत्रीपूर्ण घटना आज घडतील.
आपले कार्यक्षेत्र रूंदावणार आहे. कामाच्या ठिकाणी आपली वाहवा होईल. दिवस चांगला आहे.