Thursday Horoscope : या राशीची भरभराट होणार, तर काहींचा आजार वाढणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

प्रॉपर्टीचे व्यवहार शेतीवाडी अशा बाबतीत आज काहीतरी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल.

मेष | Saam tv

वृषभ

बहिणीची विशेष माया मिळेल. एकमेकांच्या मताने प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे. वक्तृत्व बहरेल.

Vrushabh Rashi Bhavishya | SAAM TV

मिथुन

आपल्या राशीला विशेष सुवर्ण खरेदीचे लाभ होणार आहेत. धनाची आवकजावक सुद्धा चांगली राहिल्यामुळे मानसिकता उत्तम राहील.

Mithun | saam tv

कर्क

गुरुपुष्यामृत योगाचे विशेष संधी तुमच्या राशीला आहे. जे ठरवाल ते कराल. गुरु ग्रहाचे विशेष आशीर्वादाने पुढे जाल.

kark | saam tv

सिंह

ठरवलेल्या गोष्टी तशाच घडताना दिसतील असे वाटत नाही. कुठेतरी मनाला मुरुड घालून गोष्टी अड्जस्ट करावे लागतील.

सिंह | Saam Tv

कन्या

बोलून समोरच्याचे मन जिंकणारी आपली बुद्धीवादी अशी रास आहे. आज नव्याने काही परिचय होतील. जुन्या भेटीगाठी होतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

इतरांचे करता करता आपले बाजूला राहते असे आपल्याला बरेचदा वाटते. आज करिअरकडे विशेष लक्ष द्या.

तूळ | saam tv

वृश्चिक

कुलस्वामिनीची उपासना आज आपल्याला चांगली ठरणार आहे. नवनवीन गोष्टींसाठी संधी येतील.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आपले इतरांना पटवून देण्यापेक्षा तुमच्या गोष्टी तुम्हाला तरी पटायला हव्यात. निर्णय घेतल्यावर ठाम रहा आणि एकटे का असेना पुढे जा.

Dhanu Rashi | Yandex

मकर

जोडीदाराबरोबर अबोला संभवतो आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर आज अबोला हे शस्त्र घेणं बरे आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

नोकरीमध्ये बढती मिळेल. धावपळ दगदगीचा आजचा दिवस आहे. सर्व गोष्टी करताना जपून करा.

कुंभ | Saam Tv

मीन

आपल्या राशीला भरभराट घेऊन आलेला आहे. दत्तगुरूंची उपासना करावी. आजचा दिवस सुवर्णमयीचं आहे.

Meen | Saam Tv

NEXT : Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

येथे क्लिक करा